Tag Archives: marathikavita

नातं मैत्रीचं

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे “मैत्री दिवस”. मैत्री हे नातं फारच वेगळं असतं, ह्या नात्याबद्दल काही मांडायचा छोटासा प्रयत्न.


आपण वेढलेले असतो असंख्य नात्यांनी पण
जवळचं आणि हक्काचं असतं ते नातं मैत्रीचच,
मैत्री हे रक्ताचं नातं नसतं पण
रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त ओढ असते ती मैत्रीतच,
मैत्रीत कसलीच बंधनं नसतात पण
न बांधताही अतूट असतं ते नातं मैत्रीचच,
मैत्रीत अपेक्षांचं ओझं नसतं पण अपेक्षा न करताही सारं काही मिळतं ते मैत्रीतच,
मैत्रीत काही सांगायचा नसतं पण
न सांगताही सारं काही कळत ते मैत्रीतच,
मैत्रीत चुका काढल्या जात नाहीत पण चुका न काढता सुधारल्या जातात त्या मैत्रीतच,
मैत्रीत क्षमा मागायची नसते पण
क्षमा न मागताही सारं काही माफ होतं ते मैत्रीतच ,
मैत्री हे नातं जपावं लागत नाही पण
न जपताही जे चिरंतन असतं ते नातं मैत्रीचच.

गहिवर

सूर्याची असंख्य किरणे रोज पडतात या पृथ्वीवर
पण आशेचा तो किरण गवसत नाही
मन भटकत राहतं जगाच्या नकाशावरून
आणि मग स्वर कातर होतो उगाच
आजकाल मन गहिवरून येतं उगाच

गहिवर

कोण कुठले ते लोक, ना ओळखीचे ना पाळखीचे
तरीही जोडल्या गेलो आहोत एका भीतीच्या धाग्याने
संकटाचा सामना करण्यापेक्षा कल्पनेनंच होतो बेजार
आणि मग शून्यात हरवतो उगाच
आजकाल मन गहिवरून येतं उगाच

काय कुठे कसं वागावं कळतच नाही
आणि जीव घरात रमतच नाही
उद्याचा विचार जणू सुचतच नाही
आणि गुरफटून बसतो भूतकाळात उगाच
आजकाल मन गहिवरून येतं उगाच

सगळ्या जगावर राज्य करणारा कोण हा शत्रू
कोण घालणार याला वेसण अन कधी
उजाड ओसाड रस्त्यांवरून जेव्हा फिरते नजर
अंगावर येतो शहारा उगाच
आजकाल मन गहिवरून येतं उगाच

चैतन्य

प्रत्येक काळरात्रीनंतर चैतन्यमयी प्रकाश पसरतो
आपण होऊ त्याचे साक्षीदार मन मला सांगत राहतं
ही एक उमेद देते बळ हत्तीचं करण्या संकटावर या मात सगळीकडे दिसतो मग आनंद आणि उत्साह
अन सुखाश्रूंनी परत मन गहिवरून येतं उगाच