Tag Archives: marathi kavita

आई आणि मावशी

नात्यांच्या गुलदस्त्या मधील एक झक्कास आणि हवं हवंस नातं म्हणजे मावशी. मावशी म्हणजे सख्खी मैत्रीण असते. आईची बहीण म्हणजे प्रति आईच. तर आई आणि मावशी या नात्यावर माझी ही छोटीशी कविता.

मला दोन मावश्या आहेत त्यातल्या एकीचा आज जन्मदिवस आहे म्हणून आजच्या दिवशी ही कविता मी माझ्या दोन्ही मावश्यांना अर्पित करते.

आई आणि मावशी
आयुष्यातले दोन महत्वाचे सूत्र,
आई असते सर्वस्व
तर मावशी सख्खा मित्र

आई मायेचा अथांग सागर
तर मावशी झऱ्याचं खळाळतं पाणी
आई म्हणजे उबदार गोधडी
तर मावशी म्हणजे भरजरी पैठणी

आई म्हणजे कडक शिस्त
तर मावशी म्हणजे हवी असलेली पळवाट
आई सोबत लपवा लपविचा खेळ सगळा
तर मावशी मनापर्यंत पोचणारी गुप्तवाट

आई असते wifi network
तर मावशी त्याचा password
आई whatsapp university
तर मावशी त्यातले forward

प्रभावती आणि प्रतिभा मावशी

भाषा स्पर्शाची

निराळी असते भाषा स्पर्शाची,

नाही गरज तिला लिपीची.

जे न साधे असंख्य शब्द खर्चूनही,

स्पर्श मात्र क्षणात ते घडवी.

स्पर्श मायेचा मस्तकी,

विचलित मनास तो शांतवी.

स्पर्श धिराचा पाठीवरी,

संकटं पेलण्याची शक्ती देई.

स्पर्श अधिकाराचा खांद्यावरी,

मनाच्या बेफाम घोड्यांस लगाम घाली.

स्पर्श सोबतीचा हातावरी,

जगण्यास प्रेरणा देई.

अवगत असते ती सगळ्यांनाच,

शिकण्या, शिकवण्याची गरज नाही.