पांगूळगाडा

पांगूळगाडा हे नाव उच्चारताच नुकतंच धडपडत चालायला शिकत असलेलं छोटं मूल डोळ्यासमोर येतं. पण मी जर म्हटलं की वयाच्या तिशीनंतर आज मी एक पांगूळगाडा चालवला आहे किंवा मला एका नवीन वाटेवर चालण्यासाठी एक पांगूळगाडा गवसला आहे तर, हो पांगुळगाडाच. तर ह्या माझ्या पांगुळगाड्याचं नाव आहे प्रचिती तलाठी.

तर झालं असं बरेच दिवसापासून एक नवीन वाट मला खुणावत होती. मलाही खूप इच्छा होती त्या वाटेवर चालण्याची पण सुरुवात कुठून आणि कशी करावी ते उमगत नव्हतं. आणि ती वाट म्हणजे ब्लॉग writing. मी इतरांनी लिहिलेले बरेच ब्लॉग्स वाचले होते, ब्लॉग्स लिहायला हवेत असंही ऐकलं होतं पण हे अनोळखी जग आत्मसात कसं करायचं हे मात्र जरा न सुटणारं कोडं होऊन बसलं होतं.

आणि चार एक दिवसांपूर्वी ग्रंथ वाचक कट्टा यू. ए. ई. या whatsapp समूहावरती प्रचितीचा संदेश वाचला ब्लॉगलेखन कसे करावे? ही online कार्यशाळा आणि मग काय लगेच या कार्यशाळेसाठी नाव नोंदवलं.

आणि आज म्हणजेच २९ मे २०२० या रोजी ही कार्यशाळा पर पडली. एकूण आम्ही ८ ते ९ जण या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. सुरुवात आमच्या सगळ्यांच्या परिचयाने झाली आणि मग प्रचितीने खूप छान पद्धतीने आमच्या सगळ्यांचे बोट धरून आम्हाला या ब्लॉग writing मधील wordpress या माध्यमाची अनोखी सफर घडवली. ब्लॉग्स writing बद्दलच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. कार्यशाळेची सांगता करताना प्रचिती म्हणाली जवळपास प्रत्येकालाच आयुष्यात काही नवीन गोष्टी करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी एक पांगूळगाडा लागतो आणि हे मनोमन पटलं.

अश्याप्रकारे प्रचितीच्या रूपाने मला ब्लॉग्स writing च्या वाटेवर चालायला शिकवणारा पांगूळगाडा गवसला. आणि आजचा माझा हा पहिलं ब्लॉग मी प्रचितीला dedicate करते.

16 thoughts on “पांगूळगाडा

  1. प्रकाशित लेखनाच्या नव्या दुनियेत पाऊल ठेवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. स्वरचित लेख, कविता भरपूर वाचायला मिळोत. पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.

    Like

  2. लेखक होणे हे जगातील सर्वात कठीण काम असे माझे मत आहे कारण लेखन करताना तुम्हाला नुसता स्वतःच्या भावना व्यक्त करणे आवश्यक असते पण ज्या वाचकांना आपल्याला संदेश देने आहे त्याच्या मानातील आणि भावणेचाही विचार करावा लागतो, म्हणून तुमचे लेखन अनेकांना चालनादाई व त्यांचा आयुष्यात बदल नक्कीच घडवेल हीच अपेक्षा आणि सर्वोत्तम लेखन कार्यास खूप खूप शुभेच्छा💐💐

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s